गावाबद्दल

मौजे जाफराबाद हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर पासून १७ कि.मी. अंतरावर असलेले मराठवाड्याच्या सीमेवरील हजार अकराशे लोकसंख्या असलेले गांव असून थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी अखिल भारतीय कॉंग्रेसचे प्रथम जिल्हाध्यक्ष प.पू.स्वामी सहजानंद भारती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गोदावरी नदीच्या काठावर वसलेले जाफराबाद हे छोटेसे गांव आहे.सन १९९३ साली येथे ग्रामपंचायतची स्थापना झाली. नदीकाठी असूनही कायम दुष्काळाच्या वनव्यात होरपळणारं गांव होते. शेतीला तर नाहीच पण पिण्याला सुद्धा पाणी मिळत नव्हते.पाण्यासाठी गावाची कायम वनवन अशी गावाची परिस्थिती, कोरडवाहू शेती, हाताला काम नाही दारूमुळे व्यसनाधिन झालेले ग्रामस्थ,लोकसंख्येच्या आधारावर निधीचा अभाव असल्याने विकासाचा अवघड प्रश्न अशा परिस्थितीत गावातील तरुण वर्गाच्या आग्रहाखातर सामाजिक चळवळीत असलेले युवा नेतृत्व श्री.संदीप शेलार पाटील हे सन २०१८ मध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच झाले आणि खऱ्या अर्थाने विकासाचे नवे पर्व सुरू झाले. गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी प्रथम गावातील महिलांची गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण पाहता सर्वप्रथम शाश्वत पाणी योजना राबविण्यासाठी चंग बांधला, स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून सन १९७२ साली तयार केलेल्या परंतु राजकिय उदासिनतेमुळे मृत अवस्थेत असलेला १६४ एकराचा विस्तीर्ण असा पाझर तलाव सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने लोक सहभागातुन जीवंत करण्यात आला. तसेच तत्कालीन जि.प.अध्यक्षा मा.ना.शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जि.प. निधीच्या माध्यमातुन तलाव भरण्यासाठी उपसा योजना (लिफ्ट योजना) कार्यान्वित करण्यात आली. त्या तलावाचे नामकरण पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील असे करण्यात आले. तसेच लोक सहभागात तलाव लगतचा नाला खोलीकरण करण्यात आले. गाव करेल ते राव करू शकत नाही हेच गावाच्या एकजुटीने दिसून आले. पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरु लागल्याने जाफराबादसह परिसरातील सहा गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला व हजारो एकर शेती फुलली, जलसंधारणाच्या या कामातुन प्रत्येक कुटुंबाला काम मिळाल्याने गाव सुखी व समृद्ध झाले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामस्थांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आर ओ प्लान्ट सुरु केला. यातुन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन CSC सेंटर अंतर्गत B2C व G2C सेवा देण्यात येतात. गावात ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा अंगणवाडी येथे सोलर संयंत्र बसवुन स्वतःची वीज निर्मीती केली. गावातील स्ट्रीट लाईट व हायमँक्स सोलरवर करण्यात आले, पाणीपुरवठा मोटर साठी सोलर बसविले,१००% LED Street Light, १००% दारू बंदी, व्यायाम शाळा, वाचनालय, सुसज्ज स्मशानभुमी, महिलांसाठी आरोग्य शिबीरे, बचतगटांसाठी मदत, क्रिडांगण व गावच्या भावी पिढीसाठी डिजिटल शाळा व अंगणवाड़ी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गावातील सर्व अंतर्गत रस्ते अतिक्रमन मुक्त करुन रस्त्याच्या दुतर्फा दिर्घायुषी फळझाडांची वृक्ष लागवड केली. लावलेली झाडे जगविण्यासाठी प्रत्येक कुटूंबाने पालकत्व स्वीकारले व संगोपणाची जबाबदारी घेतली. यासह गाव हद्‌दीतील सर्व शिवार रस्ते पानंद रस्ते, बांध रस्ते अतिक्रमण मुक्त करून वापरासाठी खुले केले, या गावाचा विषेश आदर्श म्हणजे गेल्या ११ वर्षापासून पोलिस स्टेशनला एक सुद्धा गुन्हा दाखल नसुन गावाने तंटामुक्त गाव पारितोषिक मिळवलेले आहे. तसेच चालु आर्थिक वर्षात मोफत दळण सुविधा चालु केली आहे.गावामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवुन गाव लोकसहभागाने स्वच्छ व सुंदर करण्यास सुरुवात करण्यात आली व ती परंपरा आजतागायत चालु आहे. १) सन २०१९/२० मध्ये आर. आर (आबा) पाटील सुंदर गांव स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम पुरस्काराने सन्मान. २) सन २०२१/२२ मधे महाआवास अभियान पुरस्काराने सन्मान. ३) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२/२३ साली पुरस्काराने सन्मान. ४) सन २०२२/२३ टिबी मुक्त पंचायत पुरस्काराने सन्मान. ५) सन २०२३/२४ मध्ये माझी वसुंधरा अभियान ४.० मधे सहभाग घेऊन नाशिक विभाग स्तर प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान. यासह इतर पुरस्काराने सन्मान. गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.संदिप शेलार पाटील यांच्या काळात झालेल्या कामाची दखल घेऊन ग्रामस्थांनी सन २०२३/२४ सालीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ.शारदा संदिप शेलार यांना बिनविरोध सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. ग्रामस्थांच्या एकजूटीच्या बळावर उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत सन २०२३/२४ मध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० मधे सहभाग घेतला विभाग स्तर प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार मिळविला ग्रामस्थांच्या एकजुटीने व ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या समन्वयाने भविष्यात जाफराबाद हे गांव हिवरे बाजार व राळेगणसिद्धी या गावाचा आदर्श समोर ठेऊन एक आदर्श गांव म्हणून नाव लौकीक नक्कीच मिळवेल. सौ.शारदा संदिप शेलार पाटील लोकनियुक्त सरपंच आदर्शगाव ग्रामपंचायत जाफराबाद ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर.

Read More

आमच्याबद्दल

आदर्श गाव ग्रामपंचायत जाफराबाद
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र

आदर्शगाव ग्रामपंचायत जाफराबाद , ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या प्रशासनाची मुख्य यंत्रणा असून गावाच्या विकासासाठी नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी पार पाडते.

ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेत आपले मत मांडण्याचा व विकासकामांबाबत सूचना देण्याचा अधिकार आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची कार्यपद्धती आहे.

पुरस्कार व सन्मान

ध्येय (Mission)

महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांसाठी विशेष उपक्रम राबवणे.ग्रामस्थांच्या गरजांवर केंद्रित राहून, सर्व सरकारी योजना पारदर्शकपणे व प्रभावीपणे राबवणे. पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करणे – जसे की रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व स्वच्छता. गावातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणे. ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून लोकशाही मूल्यांची जोपासना करणे.

ध्येय (Mission)

महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांसाठी विशेष उपक्रम राबवणे.ग्रामस्थांच्या गरजांवर केंद्रित राहून, सर्व सरकारी योजना पारदर्शकपणे व प्रभावीपणे राबवणे. पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करणे – जसे की रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व स्वच्छता. गावातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणे. ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून लोकशाही मूल्यांची जोपासना करणे.

दृष्टी (Vision)

गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकास साधण्याचा दृष्टीकोन बाळगते. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी पुरवणारे आदर्श व सुशासित गाव घडवणे.

“स्वच्छ, सुशिक्षित, सक्षम व स्वावलंबी गाव निर्माण करणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.”

दृष्टी (Vision)

गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकास साधण्याचा दृष्टीकोन बाळगते. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी पुरवणारे आदर्श व सुशासित गाव घडवणे.

“स्वच्छ, सुशिक्षित, सक्षम व स्वावलंबी गाव निर्माण करणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.”

वृत्तपत्र

आमच्या गावाची माहिती

आदर्श गाव जाफराबाद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी पुढील कार्य करतो

  • स्त्रीपुरुषएकूण
    ४२१४४२८६३
  • अ. नु.एकूण कुटुंब संख्यानळ जोडणी असलेले कुटुंब संख्याटक्केवारी
    १.१६६१२८७७.१०%
  • अ. नु.एकूण कुटुंब संख्याबंदिस्त गटारीला जोडणारी कुटुंब संख्याशोषखड्डे असणारे कुटुंब संख्याटक्केवारी
    १.१६६३७१२९१००%
  • स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील जलाशय
  • जलाशय पुनर्भरण (लिफ्ट योजना) योजना - २०१८ पासून लोकसहभागातून देखभाल
  • सप्तपदी अभियान अंतर्गत अतिक्रमण मुक्त प्रशस्त शिवरस्ते
  • सोलर संयत्र आधारित  ग्रामपंचायत,शाळा,अंगणवाडी, स्ट्रीट लाईट वीज वापर
 

फोटो गॅलरी

नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी, लसीकरण, मान्यवरांची भेट व गावाची पाहणी, सुविधा, स्ट्रीट लाईट्स, पाणी पुरवठा, लिफ्ट योजना, ग्रीन जिम सुविधा

ई रिक्षा स्विकारतांनी

ई रिक्षा स्विकारतांनी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान द्वितीय क्रमांक पुरस्कार स्विकारतांनी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान द्वितीय क्रमांक पुरस्कार स्विकारतांनी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान द्वितीय क्रमांक पुरस्कार स्विकारतांनी