आदर्श गाव ग्रामपंचायत जाफराबाद
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र

शाश्वत विकास मूलभूत सुविधा

आदर्श गाव ग्रामपंचायत जाफराबाद ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व सामाजिक विकास यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

★ तंटामुक्त गाव.      ★ हागणदारी मुक्त गाव.      ★ CCTV कक्षेत सुरक्षित गाव.      ★ आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार.      ★ महाआवास अभियान पुरस्कार.      ★ तंटामुक्त गाव पुरस्कार.      ★ निर्मल ग्राम पुरस्कार.      ★ हागणदारी मुक्त (ODF Plus) पुरस्कार.      ★ कुपोषण मुक्त गाव पुरस्कार.      ★ श्री.संदिप भाऊसाहेब शेलार - आदर्श सरपंच पुरस्कार २०२१/२२, २०२२/२३.      ★ सकाळ उदोग समूह अहमदनगर आयडॉल आदर्श सरपंच २०२२/२३.      ★ श्रीमती.शेटे सुप्रिया सुधाकर - आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२१/२२.      ★ माझी वसुंधरा अभियान ४.० नाशिक विभाग प्रथम पुरस्कार प्राप्त सन - २०२३/२४.      ★ क्षरोगय मुक्त गाव पुरस्कार प्राप्त.      ★ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त. ★ माझी वसुंधरा अभियान ५.० नाशिक विभाग प्रथम पुरस्कार प्राप्त सन - २०२४/२५.     
★ आमचे उद्दिष्ट म्हणजे जाफराबाद गावाचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास करणे आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

आमच्याबद्दल

आदर्श गाव ग्रामपंचायत जाफराबाद
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र

आदर्श गाव जाफराबाद ग्रामपंचायत, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या प्रशासनाची मुख्य यंत्रणा असून गावाच्या विकासासाठी नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी पार पाडते.

ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेत आपले मत मांडण्याचा व विकासकामांबाबत सूचना देण्याचा अधिकार आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची कार्यपद्धती आहे.

आमची ध्येय (Our Goals)

1. गरिबीमुक्त आणि उपजीविकेचे गाव
स्वस्थ गाव
३. बालस्नेही गाव
४. पाणी पुरवठा सक्षम गाव
५. स्वच्छ आणि हरित गाव
६. आत्मनिर्भर पायाभूत सुविधा असलेले गाव
७. सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव
८. सुशासन असलेले गाव
९. महिला स्नेही गाव

१. गरिबीमुक्त आणि उपजीविकेचे गाव 
२. स्वस्थ गाव 
३. बालस्नेही गाव 
४. पाणी पुरवठा सक्षम गाव 
५. स्वच्छ आणि हरित गाव 
६. आत्मनिर्भर पायाभूत सुविधा असलेले गाव 
७. सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव 
८. सुशासन असलेले गाव
९. महिला स्नेही गाव 

आमची वाटचाल (Our Journey)

१. दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पन्नाची साधने वाढवणे.
२. आरोग्य सुविधा, पोषण आणि स्वच्छता.
३. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता.
४. पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता.
५. घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षण.
६. रस्ते, वीज आणि डिजिटल सुविधा.
७. लिंग समानता आणि समाजातील सर्व घटकांना सुरक्षा.
८. पारदर्शक आणि जबाबदार पंचायत प्रशासन.
९. महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान आणि सक्षमीकरण.

१. दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पन्नाची साधने वाढवणे.
२. आरोग्य सुविधा, पोषण आणि स्वच्छता.
३. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता.
४. पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता.
५. घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षण.
६. रस्ते, वीज आणि डिजिटल सुविधा.
७. लिंग समानता आणि समाजातील सर्व घटकांना सुरक्षा.
८. पारदर्शक आणि जबाबदार पंचायत प्रशासन.
९. महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान आणि सक्षमीकरण.

“ ज्योती ज्ञानाची, आकाश संधींचे, आदित्य नव सूर्योदयाचे ”

“ आमचं गाव सुंदर गाव आदर्शगांव जाफराबाद..!”